कविता|आयुष्यभर सोबत असून|vidarbh tiger news|poem,


 Vidarbh tiger news|poem,

आयुष्यभर सोबत असून, 

जवळ कधी बसत नाही.


एकाच घरात राहून आम्ही


एकमेकास दिसत नाही.


हरवला तो आपसातला, 

जिव्हाळ्याचा संवाद.

 एकमेकास दोष देवून, 

बित्य चाले वादविवाद


इतकं जगून झाले पण, 

जगायलाच वेळ नाही. 

जगतो आहोत कशासाठी,

 काहीच कसला मेळ नाही.


अजूनही वेळ आहे.

 थोडं तरी जगून घ्या. 

सुंदर अशा जगण्याला,


डोळे भरुन बघुन घ्या.


धाव धाव धावतो आहे.


दिशा मात्र कळत नाही.


हृदयाचे पाऊल कधी,


हृदयाकडे वळत नाही.


क्षण एक येईल असा, 

घेवून जाईल हा श्वास. 

अर्यावरच थांबलेला,

 असेल जीवन प्रवास.

                                                                                 

बातम्या प्रकाशित करण्यासाठी 9561750423 या क्रमांकावर संपर्क करा.

हेही वाचा.👇👇👇

असे हो साहेब दिवस आले|कवी अनुराग हाडके

Comments