Vidarbh tiger news | wardha
*आमदार संजय गायकवाड यांचे विरुद्ध अँट्रासीटी अँक्टनुसार गुन्हा दाखल करा*
*समता सैनिक दलाची मागणी*
वर्धा:आमदार संजय गायकवाड यांच्या विरुद्ध अनुसूचित जाती -ज tvमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात यावा अशी समता सैनिक दल वर्धाच्या वतीने मा.पोलीस अधीक्षक यांना पाठविलेल्या निवेदनातून मागणी करण्यात आली.
नुकतेच शिवसेनेचे *आमदार संजय गायकवाड* हे आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात येणाऱ्या *चितोडा* या गावी गेले असता,त्यांचे नातेवाईक आणि अनुसूचित जातीच्या व्यक्तीबरोबर वाद होऊन त्यांच्या म्हणजे आमदार गायकवाडच्या नातेवाईका विरोधात *Actrocity Act* अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. तर त्यावर प्रति उत्तर म्हणून आमदार गायकवाड जातीवादी भावना मनात ठेवून बोलले की "हे लोकं खोटे गुन्हे दाखल करतात म्हणून त्यांच्या विरोधात खोट्या तक्रारी *Cross Complete* म्हणून *दरोडा आणि लुटमारी* सारखे गुन्हे दाखल करा जेणेकरून त्यांच्या मनात धास्ती निर्माण होऊन ते लोकं तुमच्यावर *Actrocity Act* दाखल करणार नाहीत आणि तुमची तक्रार जर संबंधित ठाणेदार घेत नसेल तर मला कळवा मी दहा हजार कार्यकर्ते घेऊन येतो आणि स्वतः दरोडा आणि लूटमार सारखे गुन्हे अनुसूचित जातीच्या व्यक्ती विरोधात नोंदवायला सांगतो." याप्रकारचे चिथावणीखोर वक्तव्य करून त्यांनी हेतुपुरस्सर दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणून *आमदार संजय गायकवाड वर Actrocity Act दाखल करण्याची तसेच त्याचे आमदार हे संवैधानिक पद हिरावून घेण्यात यावे व त्याना तात्काळ त्या पदा वरुन मा. मुख्यमंत्री यांनी बडतर्फ करावे अशी आपणास समता सैनिक दलाच्या वतीने करण्यात येत आहे अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन छेडण्यात येईल याची प्रशासनाने गांभीर्याने नोंद घ्यावी* अशी समता सैनिक दलाच्या वतीने मागणी करण्यात येत आहे.
यावेळी निवेदन देताना वर्धा जिल्हा संघटक अभय कुंभारे, जिल्हा सुरक्षा प्रमुख प्रदीप कांबळे, मार्शल पप्पु पाटील, मार्शल चंदु भगत,मार्शल रोशन कांबळे, मार्शल विक्की वागदे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
_____________________________________________
बातम्या प्रकाशित करण्यासाठी 9561750423 या क्रमांकावर संपर्क करा.. धन्यवाद.(भेटूया नवीन ब्लॉग सोबत)
हे पण वाचा👇👇
आई बाबा वरील मी लिहिलेले ब्लॉग वाचण्यासाठी क्लिक करा.
Comments
Post a Comment