Vidarbh tiger news|wardha
*समता सैनिक दलातर्फे व्रुक्षारोपन*
देवळी:हरीशवाडा पुनर्वसन येथील अजिंठा बुद्ध विहार परिसरात समता सैनिक दल वर्धा जिल्हा संघटक अभय कुंभारे यांच्या हस्ते व्रुक्षारोपन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून समता सैनिक दल वर्धा जिल्हा संघटक अभय कुंभारे तर प्रमुख पाहुणे म्हणून वर्धा जिल्हा सुरक्षा प्रमुख प्रदीपजी कांबळे, भन्ते प्रज्ञाकाया हे प्रामुख्याने उपस्थित होते.
मानवी जीवन सुरक्षित रहावे असे वाटत असेल तर व्रुक्ष लावणे ही काळाची गरज आहे आणि त्याच बरोबर व्रुक्षाची स्वतःच्या मुलासारखी काळजी घेणे सुद्धा तेवढेच आवश्यक आहे.प्रत्येकाने एकतरी झाड लावावे आणि हा संदेश दुसऱ्यास सांगावा, असे आवाहन अभय कुंभारे यांनी यावेळी उपस्थितांना केले.
यावेळी समता सैनिक दलाचे मार्शल अमोल वंजारी,मार्शल रणजित भगत,मार्शल अमोल ताकसांडे, पत्रकार मार्शल रोशन कांबळे, मार्शल प्रल्हादराव खोब्रागडे,मार्शल किशोर वाहाणे,मार्शल ज्ञानेश्वर बोरकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
______________________________________________
बातम्या प्रकाशित करण्यासाठी 9561750423 या क्रमांकावर संपर्क करा...धन्यवाद
आणि हेही वाचा👇👇👇👇👇
Exam च्या वेळी येणारे विचार हा ब्लॉग वाचण्यासाठी क्लिक करा.
Comments
Post a Comment