Vidarbh tiger news|आगरगाव
*यशवंत विद्यालय आगरगाव येथे
छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी*
आगरगाव:स्थानिक यशवंत विद्यालय आगरगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यशवंत विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.उर्मिला मसराम या होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ शिक्षक रमेश ठाकरे,संगीता मालेकर हे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरवातीला रयतेचे राजे, बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतीमेला ज्येष्ठ शिक्षक रमेश ठाकरे यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या वतीने शिवाजी महाराज यांच्या जिवनचरित्रावर आधारित समुहगीत गायन करण्यात आले.त्यानंतर शिवाजी महाराज यांच्या विषयी कु.स्वरा भोयर,सांची काबळे,कोमल नेहारे,गायत्री नेहारे, भुमिका टेकाम, जानवी आठबैले,विना ढोक,आचल नेहारे आदी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.त्यानंतर अध्यक्षीय भाषणातून उर्मिला मसराम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक व संचालन अभय कुंभारे यांनी तर आभार शशिकांत सानप यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील ज्येष्ठ शिक्षक रमेश ठाकरे, संगीता मालेकर,अभय कुंभारे, शशिकांत सानप,शिक्षकेत्तर कर्मचारी दिनेश नेहारे आदिंनी परिश्रम घेतले.
Comments
Post a Comment